महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी घेतली अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस संघटना शाखा अकोला यांच्या सोबत बैठक.
अकोला दि.
11 मे 20 – अकोला
महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना संक्रमीत रूग्ण आढळ्याने अकोला महानगरपालिका
येथील आरोग्य विभागासह सर्व विभागाचे अधिकारी/कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहे
तसेच यामधून मनपातील दोन सफाई कर्मचा-यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यांना
कोरोनापासून बचावासाठी साधन सामग्री जसे मास्क, हॅण्ड ग्लोज, सेनीटायझर देण्यासंदर्भात
आज महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी उपमहापौर राजेंद्र गिरी, स्थायी समिती सभापती
सतीष ढगे, माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या समवेत बैठक घेतली.
या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेता साजिद
खान पठाण, क्षेत्रीय अधिकारी संदीप गावंडे, विठ्ठल देवकते, राजेंद्र टापरे, आरोग्य
विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर यांची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये संघटनेव्दारे कोव्हीड –
19 मध्ये काम करतांना मृत पावलेल्या कर्मचा-यांचे व कंत्राटी आणि मानसेवी कर्मचारी यांना 15 लक्ष रूपये
देणेविषयीची अंमलबजावणी संदर्भात पत्राची प्रत देणे, कोव्हीड – 19 मध्ये जिवाची
परवा न करता काम करणा-या मनपातील तसेच कंत्राटी व मानसेवीसह सर्वच कर्मचा-यांना वैद्यकीय उपचाराकरिता विशेष
बाब म्हणून आर्थिक मदत देणे बाबत, 50 ते 55 वर्ष पुर्ण झालेल्या तसेच हृदयविकार,
मधुमेह व गंभीर आजार असलेल्या कर्मचा-यांना कोव्हीड – 19 च्या कामामधून सुट देणे बाबत. कोव्हीड – 19 मध्ये शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये कर्तव्या
बजावणा-या सर्व कर्मचा-यांना सॅनीटायझर, हातमोजे, मुखवटे, गणवेष, पी.पी.ई. कीट
देणे बाबत, कंत्राटी आरोग्य निरीक्षक, ऑपरेटर, मानसेवी कर्मचा-यांचे
जाने/फेब्रुवारी 2020 पासूनचे थकित वेतन मिळावे व त्यांना मुदतवाढ देणे बाबत याचसोबत
मनपा कचरा घंटा गाडी चालक, कचरा ट्रॅक्टर चालकांना सुध्दा साहित्ये देणे या
मागण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संबंधीत विभागांना यासाठी सुचना
देण्यात आल्या व साहित्यांची गरज लक्षात घेवून खरेदी करण्याच्या सुचना देयात
आल्या. तसेच वेतनाबाबत नियमती अनुदान प्रात झाल्या बरोबर वेतन अदा करणेबाबत
संबधीतांना सुचीत करण्यात आले. सर्व झोन
अधिकारी यांना काम करतांना कोणत्या अडचणी आहेत किंवा नाही याबाबत विचारणा करण्यात
येवून कोरोना पॉझेटीव्ह रुग्णांना तातडीने वैद्यकीय महाविद्यालय येथे पुढील उपचारासाठी
पाठविण्यासाठीची कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस
संघटनेचे अनुप खरारे, पी.बी.भातकुले, शांताराम निंधाने, विजय सारवान, हरिभाउ खोडे,
धनराज सत्याल, रमेश गोडाले व संघनेच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment