मनपा आयुक्त यांनी दिली भरतीया रुग्णालय येथे भेट.
आज दि. 17 मेरोजी सकाळी
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी किसनीबाई भरतीया रूग्णालय येथे मनपा व्दारे
सुरू असलेल्या स्वॅब कलेक्शन सेंटरला भेट दिली तसेच याठिकाणी डॉक्टरांशी चर्चा
करून त्यांना बैदपुरा, माळीपुरा, गवळीपुरा व मुजफ्फर नगर येथील नागरिकांचा स्वॅब
घेउन चाचणी अहवाल येई पर्यंत त्यांना त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाईन करण्याच्या
सुचना दिल्या. तसेच स्वॅबसाठी आलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय
होउ नयेत याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या. तसेच शहरामध्ये कोरोनाचा
प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जास्त प्रमाणात संशयीत नागरिकांचे स्वॅब घेणे खूप
गरजेचे असल्याने मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये टिळक रोडवर
स्थित किसनीबाई भरतीया रूग्णालय येथे दि. 5 मे 2020 पासून शहरातील कंटेन्मेंट
झोन मध्ये राहणा-या कोरोना संशयीत नागरिकांचे स्वॅब घेण्याचे कामास सुरूवात
करण्यात आली होती व आज दि. 17 मे रोजी दुपारपर्यंत एकुण 908 नागरिकांचे स्वॅब
घेण्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment