कोरोना सदृश्य आजाराबाबत माहिती देणे संदर्भात मनपा आयुक्त यांनी मुजफ्फर नगर येथील नागरिकांशी साधला संवाद.


अकोला दि. 16 मे 20  ी संख्‍येमध्‍ये एकाने वाढ – अकोला महानगरपालिका क्षेत्रातील दक्षिण झोन अंतर्गत असलेल्‍या मुजफ्फर नगर येथील कोरोना रुग्‍णांची मृत्‍यु झाल्‍याने दि. 16 रोजी संध्‍याकाळी मनपा आयुक्‍त यांनी मुजफ्फर नगर येथील पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मनपा आयुक्‍त यांनी, ज्‍या नागरिकांना डायबीटीज, हायपर टेंशन, सर्दी, ताप, खोकला सारखे आजार असतील त्‍यांनी या आजाराबाबतची माहिती न लपवता रेड क्रॉस सोसायटी येथे मनपा व्‍दारा करण्‍यात आलेली व्‍यवस्‍थेचा लाभ घ्‍यावा तसेच गरज असल्‍यास त्‍यांना डायबीटीज व ईतर आजारांसाठी 1 महिन्‍याचे औषध मोफत देण्‍यात येणार आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चांगल्‍या दर्जाचे उपचार होत असून नागरिकांनी घाबरण्‍याचे कारण नाही, तसेच ज्‍या रूग्‍णांमध्‍ये कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळून आल्‍यास त्‍यांना किसनीबाई भरतीया रूग्‍णालय येथे घस्‍यातील स्‍त्रावाचे नमुने घेण्‍यासाठी पाठविण्‍यात येणार नमुने घेतल्‍यानंतर त्‍यांना घरीच क्‍वारंटाईनमध्‍ये ठेवण्‍यात येणार व चाचणी अहवाल पॉझेटीव्‍ह आल्‍यावर त्‍यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रूग्‍णालय येथे पाठविण्‍यात येणार उपचार घेतल्‍यावरच रूग्‍ण बरा होत असतो याची सर्वांनी जाणीव ठेवली  पाहिजे. याचसोबत नागरिकांनी सोशल डिस्‍टसींग, चेह-यावर मास्‍क किंवा चांगला धुतलेला रूमाल बांधणे, वारंवार साबणाने हात धुणे, सेनीटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. व त्‍यांना असलेल्‍या आजाराबाबतची माहिती मनपाला देण्‍यासाठीच्‍या सुचना केल्‍या. कोरोना संदर्भात असलेले गैरसमज काढले. तरी नागरिकांनी कोरोनाशी लढा देण्‍यासाठी व होत असलेल्‍या मृत्‍यु थांबविण्‍यासाठी  सहकार्य करण्‍याचे आवाहन मनपा आयुक्‍त यांनी केले आहे.
          यावेळी नगरसेवक मनपा विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण, नगरसेवक मो.ईरफान क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, विजय पारतवार, आरोग्‍य निरीक्षक आदिंची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.