मनपा प्रशासनाव्दारे कोरोनाची रोकथाम करण्यासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्या्साठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दिली विविध ठिकणी भेंट.
अकोला दि. 16
मे 20 – अकोला
महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव थांबविण्याच्या
दृष्टीने मनपा प्रशासनाव्दारे करण्यात आलेल्या उपययोजनांचा आढावा घेण्यासाठी दि.
16 मे रोजी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी शहरातील विविध भागातील कंटेन्मेंट
झोनमध्ये भेट देउन आढावा घेतला. यामध्ये बैदपुरा, रेड क्रॉस सोसायटी, खैर मोहम्मद
प्लॉट, शासकीय वैद्यकीय रूग्णालय येथे भेट तसेच सायंकाळी मुजफ्फर नगर या भागातील
कंटेन्मेंट झोन यांचा समावेष आहे.
यामध्ये मनपा आयुक्त यांनी
बैदपुरा येथे मनपा व्दारे 15 डॉक्टरांच्या चमुव्दारे करण्यात येणारी वैद्यकीय
चाचणी व आशा वर्कर आणि मनपा शिक्षकांव्दारे करण्यात येणा-या सर्व्हेक्षणासंदर्भात
भेट दिली तसेच मनपाव्दारे दिपक चौक येथील रेड क्रॉस सोसायटी येथे बैदपुरा,
माळीपुरा, गवळीपुरा तसेच मुजफ्फर नगर येथील नागरिकांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी तीन
शिफ्ट मध्ये करण्यात येत आहे व डायबीटीज, हायपर टेंशन, दमा तसेच हृदयाशी संबंधीत
आजारांची तपासणी करून आवश्यकता असल्यास त्यांना 1 महिन्यांचे औषधी मोफत देण्याचे
काम सुरू असून तसेच ज्या रूग्णांमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्यांना
किसनीबाई भरतीया रूग्णालय येथे घस्यातील स्त्रावाचे नमुने घेण्यासाठी पाठविण्यात
येत आहे या ठिकाणी मनपा आयुक्त यांनी भेट दिली तसेच याकामामध्ये येणा-या अडचणी
बाबत विचारणा केली तसेच खैर मोहम्मद प्लॉट येथे भेट दिली. तसेच शासकीय वैद्यकीय
रूग्णालय येथे भेट देउन कोरोनाच्या होत असलेल्या उपचारा संदर्भात डॉक्टरांशी
चर्चा केली. यावेळी नगरसेवक डॉ.झिशान हुसैन, क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते व
मनपा कर्मचा-यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment