आमदार रणधीरजी सावरकर यांच्या निधीतून गुडधी येथील नवीन पिण्या्च्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे कामाला सुरूवात.


अकोला दि. 26 मे 20  अकोला अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व क्षेत्रांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाव्‍दारे रस्‍ता रुंदीकरणचा काम करतावेळी गुडधी भागाला पाणी पुरवठा करणारी मुख्‍य जलवाहिनी पुर्णपणे क्षतीग्रस्‍त होउन तेथील पाणी पुरवठा मागील दोन महिन्‍यापासून पुर्णपणे बंद होता. महापौर अर्चना मसने व तया भागातील नगरसेवक यांच्‍या विनंतीवरून आमदार रणधीरजी सावरकर यांनी त्‍यांच्‍या स्‍थानिक विकास निधी अंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्‍यासाठी 65 लक्ष रूपयांचा निधी मंजूर करून दिला होता. त्‍या अनुषंगाने आज दि. 26 मे रोजी मोठ्या उमरी मधील गाडगे महाराज सार्वजनिक वाचनालय ते गुडधी पर्यंत नवीन मुख्‍य जलवाहिनी टाकण्‍याचे कामाला सुरूवात करण्‍यात आली आहे. ही पाईपलाईन टाकल्‍यामुळे गुडधी येथील नागरिकांची पिण्‍याच्‍या पाण्‍याची समस्‍यावर कायमस्‍वरूपी तोडगा निघणार असल्‍याचे महापौर सौ.अर्चना मसने यांनी यावेळी सांगितले आहे.
          यावेळी महापौर सौ.अर्चना मसने, जयंत मसने, नगरसेवक मिलींद राउत, संतोष शेगोकार, नगरसविका अनुराधा नांवकार, पल्‍लवी मोरे, संदीप गावंडे, अनिल नांवकार, शिवलाल इंगळे, जलप्रदाय विभागाचे अभियंता एच.जी.ताठे, निशा निकामे, कंत्राटदार संजय अग्रवाल व कर्मचा-यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.