मनपा आयुक्त यांच्या आदेशान्वये ईरानी वस्ती् येथे प्राथमिक वैद्यकीय आरोग्य तपासणीचे आयोजन करून करण्यात आली नागरिकांची तपासणी.
अकोला
दि. 31 मे
2020 – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषणूचा होत
असलेला प्रादुर्भावावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस
यांच्या आदेशान्वये दिपक चौक वरील रेड क्रॉस सोसायटी व टिळक रोडवरील किसनीबाई
भरतीया रूग्णालय येथे शहरातील कंटेन्मेंट झोन तसेच ईतर जवळच्या परिसरातील
नागरिकांची प्राथमिक वैद्यकीय आरोग्य तपासणी करून ज्या नागरिकांना
डासबीटीज, उच्च रक्त दाब, हाईपर टेंशन व सर्दी, ताप, खोकला सारख्या आजाराची
लागण आहे त्यांना मोफत औषधी देण्याचे काम सुरू आहे, परंतू गांधी जवाहर बागेच्या
मागील ईरानी वस्ती येथील राहणा-या वयोवृध्द नागरिकांना याठिकाणी जाणे अवघड होत
होते या अनुषंगाने आज मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस
यांच्या आदेशान्वये मेहरबानो कॉलेजच्या समोरील खुल्या मैदानावर प्राथमिक वैद्यकीय
आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी 60 वर्ष वयोगटातील व त्यावरील
नागरिकांची डायबीटीज, ब्लडप्रेशर, ऑक्सीमीटर व्दारे शरीरामधील आक्सीजनची
मात्रा तसेच ईतर वयोगटातील ज्या नागरिकांना
सर्दी, ताप, खोकला आहे त्यांची तपासणी करून त्यांना घरपोच औषधीचे चितरण करण्यात
आले आहे.
सदर
तपासणी केंद्र येथे मनपा आयुक्त संजय कापडणीस व निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय
खडसे यांनी भेट दिली. तसेच मनपा आयुक्त यांनी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना
आपल्याला असलेला आजार हा लपवू नये व वेळेत उपचार घेण्यासाठी सुचना केल्या तसेच
सोशल डिस्टसींग नियमाचे काटेकोरपणे पालन करून व चेह-यावर मास्क व सेनीटायझरचा
वापर करून कोरोना पासून आपले बचाव करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी या
परिसरातील नागरिकांच्या वतीने, आमच्या भागात दररोज मनपांच्या चमुव्दारे सर्व्हेक्षण
होत असून आमच्या परिसरात वैद्यकीय तपासणीचे आयोजन करून दिल्याबद्दल मनपा आयुक्त
यांचे आभार मानले.
यावेळी क्षेत्रीय अधिकारी
विजय पारतवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर मुदगल, राजु भिरड, वैशाली शिरसाट, पल्लवी
जाधव, राजेंद्र खेते, शारदा साबरे, प्रणाली खंडारे, शिला वाघोदे, राजेश नाईकवारे,
ज्योती सुरवाडे, कर वसुली लिपीक नारायण साखरे आदिंनी परिश्रम घेतले. तसेच या
भागातील रानी ईरानी, फिदा हुसैन व अनिल इंगळे यांनी या तपासणीसाठी मोलाचे सहकार्य
केले.
Comments
Post a Comment