मनपा आयुक्त संजय कापडणीय यांनी बापु नगर येथील कोरोनाने बाधित होते त्या रूग्णांच्या घरात बसून पाणी पिउन दुर केले नागरिकांचे गैरसमज.
अकोला दि. 17
मे 20 – आज दि. 17
मे रोजी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बापु नगर येथे मनपा मध्ये कार्यरत
असलेल्या दोन सफाई कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती तसेच उपचारानंतर त्यांची
कोरोना फेर चाचाणी अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात
आले असून परिसरातील नागरिकांव्दारे त्यांच्या परिवारासोबत गैर व्यवहार होत
असल्याची माहिती मिळाल्या वूरन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी आज बापु नगर
येथे भेट देउन नागरिकांशी संवाद साधले तसेच मनपा आयुक्त यांनी रुग्णाच्या घराच्या
आत बसून त्यांच्या आईच्या हाताने पाणी पिउन नागरिकांचे कोरोना रोगाबाबतचा गैर
समज काढला. तसेच कोरोना रोग कशा प्रकारे होतो व त्यापासून बचावसाठीचे उपाय याबाबत
उपस्थित नागरिकांना माहिती दिली तसेच हे पण आपल्या परिवातील एक सदस्य असून यांना
सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आयुक्त यांनी यावेळी केले. तसेच यावेळी तेथील
नागरिकांनी व संघटनेच्या पदाधिकारी यांनी मनपा सफाई कर्मचा-यांचे आरोग्य विषयक
काळजी घेण्यासाठी व मनपा स्वच्छता कर्मचा-यांना संक्रमण होउ नये यासाठी मास्क,
हातमोजे, सेनीटायझर व प्रोटेक्शन कीट पुरविले तसेच रूग्णाच्या घर बसून पाणी
पिउन सर्वांचे गैरसमज दुर केले याबाबत मनपा आयुक्त यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी मनपा आरोग्य विभागाचे विभाग
प्रमुख प्रशांत राजुरकर, संघटनेचे पी.बी.भातकुले, अनुप खरारे, ननकू शुक्लवारे, धनराज
सत्याल, आरोग्य निरीक्षक तसेच परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment