शहरामध्ये अनाधिकृतरित्या टाकण्यात आलेले भुमिगत व ओव्हरहेड केबल तसेच मोबाईल टॉवर यांच्याविरूध्द होणार पोलीस कारवाई.
अकोला महानगरपालिका क्षेत्रात विविध कंपनी व्दारा भुमिगत तसेच ओव्हरहेड
केबलचे जाळे टाकण्यात आलेले आहे. तसेच या खाजगी कंपनी व्दारा शहरामध्ये
अनाधिकृतरित्या टॉवरसुध्दा उभारण्यात आलेले आहेत. या संदर्भात महानगरपालिके व्दारा
वेळोवेळी कंपन्यांना नोटीस बजावून पोलीस तक्रार सुध्दा करण्यात आल्यावरही
कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे मा.केंद्रीय मंत्री महोदयांच्या
अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली होती व सदर बैठकीत सर्व खाजगी दूरसंचार कंपन्यांव्दारे
टाकण्यात आलेल्या भुमिगत, ओव्हरहेड केबल
बाबत स्वयंघोषणापत्र तयार करून त्याबाबत आवश्यक दुरूस्ती शुल्क, रस्ता दुरूस्ती शुल्क भरण्याबाबत सुचित
करण्यात आले होते. अशी प्रक्रिया करून सदर केबल नियामनुकूल करण्याच्या
सुचना दुरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या समक्ष देण्यात आल्या
होत्या. परंतू वारंवार सुचना देउनसुध्दा खाजगी कंपन्याव्दारे अकोला
महानगरपालिका क्षेत्रात अनाधिकृतरित्या टाकण्यात आलेल्या भुमिगत
केबल, ओव्हरहेड केबल व टॉवर उभारणी संदर्भात अनेकदा संधी
देउनही कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे महानगरपालिका व्दारा सदर कंपनी व त्यांचे
वरिष्ठ संचालकांविरोधात पोलीस कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच
सर्व शासकीय, आर्थिक, वैद्यकीय व व्यापारी
ईत्यादी विभाग हे संगणक, मोबाईल व इंटरनेट व्दारा संचालित
होत असून सर्व सामान्य नागरिकांना त्रास होउ नये या उद्देशाने महानगरपालिकेव्दारा
अप्रीय कार्यवाही टाळण्याचे प्रयत्न होत होते. परंतू वारंवार संधी दिल्यावरही
खाजगी दूरसंचार कंपन्यांवर आवश्यक कार्यवाही सह केबल खंडीत करण्याच्या निर्णय
घेण्यात आला आहे.
कोरोना विषयक कामकाज पुर्ण झाल्यानंतर सदर कार्यवाही प्राधान्याने
पुर्ण करण्यात येईल. रिलायंस जिओ कंपनी व्दारा शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत
केबल टाकले असल्यामुळे व वारंवार संधी दिल्यानंतरही अनधिकृत केबलचे जाळे
नियमानुकूल करण्यास प्रतिसाद न दिल्याने रिलायंस कंपनीला आता महानेट प्रकल्प
महानगरपालिका क्षेत्रात राबविणे शक्य होणार नाही.
Comments
Post a Comment