होमीओपैथीक मेडीकल कॉलेज अॅण्ड हॉस्पीटल यांच्या वतीने मनपा अधिकारी/कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्यांची रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्याची औषधी देण्यात आली.
अकोला
दि. 18
मे 20 – अकोला
महानगरपालिका क्षेत्रामध्ये आजपर्यंत शहरातील विविध भागांमध्ये कोरोना संक्रमीत रूग्ण
आढळून आले असल्याने शहरामध्ये जवळपास 44
कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहे. कंटेन्मेंट झोनच्या आत हायरीस्क
मध्ये काम करणा-या मनपा कर्मचा-यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोरोना
विषाणूची लागण होउ नये यासाठी त्यांची व त्यांच्या परिवातील सदस्यांची रोग
प्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक
सुचनेनुसार होमीओपैथीक मेडीकल कॉलेज ऍण्ड हॉस्पीटल, आकोट रोड अकोला यांच्या
वतीने औषध तयार करून 5500 औषधीच्या बॉटल आज दि. 18 मे रोजी मनपा आयुक्त संजय
कापडणीस यांच्या कडे सोपविण्यात आली आहे. यावर मनपा आयुक्त यांनी त्यांचे आभार
व्यक्त केले.
यावेळी होमीओपैथीक मेडीकल कॉलेज ऍण्ड
हॉस्पीटल प्रिंसीपल डॉ.संजयकुमार तिवारी, अध्यक्ष डॉ.तिलकराज सरनाईक, सेक्रेटरी
डॉ.जयप्रकाश जयस्वाल, सदस्य संजकुमार शाह व कर्मचारी शशीकांत त्रिपाठी, रामलाल
लद्दड, प्रमोदकुमार पांडे व दिनेश तिवारी आदिंची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment