मनपा कर्मचा-याला कोरोनाची लागण झाल्याने आयुक्त यांनी घेतली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे धाव.


अकोला दि. 27 मे 2020 – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी तसेच कोरोना संक्रमीत रूग्णांना जी.एम.सी.येथे भरती करणे, कंटेन्मेंट भागामध्ये सर्व्हेक्षण करणे, कोरोना संक्रमीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेउन तसेच कंटेन्‍मेंट भागात राहणा-या नागरिकांमध्‍ये सर्दी,ताप, खोकला व कोरोना सदृश्‍य लक्षणे असलेल्‍या नागरिकांचा शोध घेउन त्यांची कोरोनाची चाचणी करून घेणे, तसेच गरजूंना वैद्यकीय सेवा पुरविणे, कंटेन्मेंट भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करणे, प्रभागातील स्वच्छता, तसेच शहरातील नागरिकांना मनपा कडून देण्यात येणा-या मुलभुत सोई-सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारचा तुटवडा होउ नयेत यासाठी मनपा अधिकारी/कर्मचारी दिवसरात्र हायरीस्क मध्ये काम करीत असून त्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
          अकोला मनपातील एक आरोग्य निरीक्षकाला 26 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याने त्याला जी.एम.सी.येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले असून आज मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तेथे भेट दिली कर्मचा-याची प्रकृती बाबत डॉक्टरांशी चर्चा केली. तसेच या आगोदर 25 मे रोजी मनपा वैद्यकीय आरोग्य विभागामधील एक वैद्यकीय अधिकारीला कोरोनाची लागण झाल्याने मनपा आयुक्त  यांनी जी.एम.सीला भेट देउन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली होती.
          तसेच शहरामध्‍ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता नागरिकांनी जास्‍त खबरदारी खूप आवश्‍यक असून नागरिकांनी सोशल डिस्‍टसींग नियमाचे काटेकोरपणे पालन करणे, चेह-यावर मास्‍क किंवा चांगला धुतलेला रुमाल सतत बांधणे, वारंवार साबणाने किंवा हॅण्‍ड वॉशने हात धुणे किंवा सेनीटायझरचा वापर करणे, जीवनावश्‍यक वस्‍तू खरेदीच्‍या व्‍यतिरिक्‍त घराबाहेर न जाणे तसेच सर्दी, ताप, खोकला असलेल्‍या नागरिकांनी हलगर्जी न करता वैद्यकीय सेवा घेण्‍याचे  आवाहन मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांनी यावेळी केले आहे.  

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.