महापौर सौ.अर्चना मसने यांनी घेतला मलेरिया विभागाचा आढावा.
अकोला
दि. 8 मे 20 – अकोला
अहानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना संक्रमीत रूग्णांची संख्येमध्ये दिवसेंदिवस
वाढ होत असून व याचसोबत शहरामध्ये कंटेन्मेंट झोनच्या संख्येमध्ये सुध्दा
वाढ होत असून त्या अनुषंगाने शहरामधील कंटेन्मेंट झोनची व सर्व प्रभागांमधील
परिसराला निर्जंतूक करण्यासाठी फवारणी हा खूप महत्वाचा भाग असून आज महापौर
सौ.अर्चना जयंत मसने यांनी उपमहापौर राजेंद्र गिरी व माजी महापौर विजय अग्रवाल
यांच्या समवेत अकोला मनपा मलेरिया विभागाची आढावा सभा घेतली.
यासभेमध्ये मलेरिया विभागात आजरोजी
कार्यरत पंप चालक, सुपरवायझर व त्यांच्याकडे असलेल्या प्रभागांची व कंटेन्मेंट झोनबाबतची तसेच
प्रशासनाव्दारा देण्यात येणारी औषधी याबाबतची संपुर्ण माहिती घेण्यात आली आहे. तसेच
यावेळी प्रत्येक प्रभागात दररोज सकाळी फवारणीसाठी दोन कर्मचारी देणे, प्रतिबंधीत
क्षेत्रामध्ये प्रत्येक कंटेन्मेंट भागात फवारणीसाठी 10 कर्मचा-यांव्दारे फवारणीचे
काम सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत करणे, शहरामध्ये फवारणीचे काम जास्त प्रभावीपणे
करण्यासाठी नवीन 40 फवारणी पंप खरेदी करणे आदिंबाबतच्या सुचना यावेळी देण्यात
आल्या. तसेच फवारणीसाठी लागणारी औषध पुरवठा शासनाकडून प्राप्त करून घेणे तसेच
मनपा क्षेत्रातील ज्या भागात कोरोना पॉझेटीव्ह रूग्ण आढळून आल्याबरोबरच त्याच
क्षणी तातडीने त्या भागात फवारणीचे काम सुरू करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली.
तसेच फवारणीच्या कामासाठी अतिरिक्त देण्यात आलेले कर्मचारी यांना तातडीने
मलेरिया कार्यालय येथे रुजू करून घेण्यासाठी सुचना देण्यात आल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता जयंत मसने, माजी नगरसेवक
हरिभाउ काळे, सुपरवायझर पांडुरंग चिंचोळकर, प्रकाश बामनेट, अजय शिरसाट, पंजाब
लोहापुरे यांचेसह सर्व पंप चालकांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment