आमदार श्री रणधीरजी सावरकर यांनी घेतला कोव्हीड-19 संदर्भातील सर्व्हेक्षणाचा आढावा.

अकोला दि . 1 1 जून 2020 – अकोला महानगरपालिकाक्षेत्रामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि. 10 जून रोजी संध्याकाळी केंद्रीय राज्य मंत्री मा.ना.श्री संजयजी धोत्रे यांच्या मार्गदर्शनात आमदार श्री रणधीरजी सावरकर यांनी अकोला महानगरपालिका क्षेत्रामधील कंटेन्मेंट झोनमध्ये मनपाव्दारे तसेच कंटेन्मेंट झोन वगळून संपुर्ण शहरामध्ये जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात येणा-या सर्व्हेक्षणाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीमध्ये महापौर सौ.अर्चना जयंत मसने, माजी महापौर श्री विजय अग्रवाल, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, मनपा उपायुक्त वैभव आवारे, तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार विजय खेळकर, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक जयंत मसने, नगरसेवक डॉ.विनोद बोर्डे, धनंजय धबाले यांची उपस्थिती होती. याबैठकीमध्ये मनपा व्दारे एकुण 233 टीम लावण्यात आली असून प्रत्येक टीममध्ये एक आशा वर्कर, व एक शिक्षक/कर वसुली लिपीक यांच्या समावेष आहे. तसेच या टीमव्दारे तपासणीचा पहिला टप्पा प...