जीवनावश्यक वस्तूस जसे मेडीकल, कृषी विषयक दुकाने/कृषक केंद्रे यांचेसह किरणा व्यावसायिकांना सुध्दा सम-विषमच्या नियमातून सूट – संजय कापडणीस
अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना
विषणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शहरामध्ये मॉल, मार्केट, कॉम्प्लेक्स,
थिएटर, तरण तलाव ईत्यादी वगळून ईतर आस्थापनांना सम-विषम दिनांकानुसार दुकाने
उघडी करून व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, आज मनपा आयुक्त यांच्या
आदेशान्वये शहरातील जीवनावश्यक वस्तू जसे मेडीकल, दुध डेअरी, दुध विक्री, कृषी
विषयक दुकाने व कृषक केंद्रे यांचेसह आता किरणा दुकाने यांना सुध्दा सम –
विषमच्या नियामतून सूट देण्यात आली आहे.
तरी शहरातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठान धारकांना मनपा प्रशासनाव्दारे
आवाहन करण्यात येत आहे कि, जीवनावश्यक वस्तू जसे मेडीकल, दुध डेअरी, दुध
विक्री, कृषी विषयक दुकाने, कृषक केंद्रे किरणा दुकाने वगळून ईतर सर्व व्यावसायिक
प्रतिष्ठाने प्रशासनाने ठरवून दिलेल्या सम-विषम दिनांक व वेळेतच उघडावी अन्यथा
नियमाचे उल्लंघन करणा-या व्यावसायिकांविरूध्द मनपा प्रशासनाव्दारे कारवाई करण्यात
येणार.
Comments
Post a Comment