आमदार श्री रणधीरजी सावरकर यांनी घेतला कोव्हीड-19 संदर्भातील सर्व्हेक्षणाचा आढावा.
अकोला दि. 11 जून 2020 – अकोला महानगरपालिकाक्षेत्रामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता
दि. 10 जून रोजी संध्याकाळी केंद्रीय राज्य मंत्री मा.ना.श्री संजयजी धोत्रे
यांच्या मार्गदर्शनात आमदार श्री रणधीरजी सावरकर यांनी अकोला महानगरपालिका
क्षेत्रामधील कंटेन्मेंट झोनमध्ये मनपाव्दारे तसेच कंटेन्मेंट झोन वगळून
संपुर्ण शहरामध्ये जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात येणा-या सर्व्हेक्षणाचा
आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीमध्ये महापौर सौ.अर्चना जयंत मसने,
माजी महापौर श्री विजय अग्रवाल, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, मनपा उपायुक्त
वैभव आवारे, तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार विजय खेळकर, सामाजिक कार्यकर्ते
तथा माजी नगरसेवक जयंत मसने, नगरसेवक डॉ.विनोद बोर्डे, धनंजय धबाले यांची उपस्थिती
याबैठकीमध्ये मनपा व्दारे एकुण 233 टीम लावण्यात आली असून प्रत्येक टीममध्ये एक आशा वर्कर, व एक शिक्षक/कर वसुली लिपीक यांच्या समावेष आहे. तसेच या टीमव्दारे तपासणीचा पहिला टप्पा पुर्ण झाला असून दुस-या टप्प्यासाठी जास्त प्रभावीपणे सर्व्हेक्षण करण्यासाठी आमदार श्री सावरकर यांनी सुचना केल्या. तसेच ज्या नागरिकांना डायबीटीज, उच्च रक्त दाब, हाईपर टेंशन व सर्दी, ताप, खोकला सारख्या आजाराची लागण आहे अशा नागरिकांवर दररोज निरीक्षण करण्यात यावे. तसेच मनपा व्दारे होत असलेले सर्व्हेक्षणाच्या कामावर समाधान व्यक्त केले. तसेच कंटेन्मेट झोन वगळून शहरातील ईतर सर्व भागांमध्ये राहणा-या नागरिकांचे सर्व्हेक्षणाचे काम जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या 426 टीमव्दारे सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे यामध्ये ऑक्सीमीटर व्दारे त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सीजनची मात्राची तपासणी व डायबीटीज, उच्च रक्त दाब, हाईपर टेंशन, सर्दी, ताप, खोकला व कोरोना सदृश्य आजाराचे लक्षण असलेल्या नागरिकांची नोंद घेण्यात येते परंतू या कामामध्ये आपसामध्ये समन्वय नसल्याचे आढळून आल्याने आमदार श्री सावरकर यांनी याकामामध्ये महापौर सौ.अर्चना जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल तसेच सर्व प्रभागातील नगरसेवक यांचा सहभाग घेउन सर्व्हेक्षणचे काम जास्त प्रभावीपणे करणे खूप गरजेचे आहे त्या अनुषंगाने मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तरित्या बसून त्याबाबतचा आराखडा तयार करून त्या आधारे सर्व्हेक्षणाचे काम जास्त प्रभावीपणे व कमीत-कमी दिवसामध्ये पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. तसेच सदर सर्व्हेक्षण हे तातडीने करणे गरजेचे आहे व या सर्व्हेक्षणाचा अहवाल दररोज मनपाचे डॉ. फारूख शेख यांच्या कडे पाठविण्याच्या सुचना दिल्या. आणि हायरीस्क मधील नागरिकांना झोन अधिकारी यांनी तातडीने क्वारंटाईन करणे खूप गरजेचे असून त्यांनी क्वारंटाईनचे कामे तातडीने करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
Comments
Post a Comment