शहरातील व्यावसायिकांनी सम आणि विषम दिनांका प्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त. (मेडीकल, कृषी विषयक दुकाने/कृषक केंद्रे यांना सम-विषमच्या नियमातून सूट)
आपत्ती व्यवस्थापन कायदा – 2005 तसेच
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता
मनपा हद्दीतील दुकाने (मॉल, मार्केट, कॉम्प्लेक्स) वगळून यांची P-1, व P-2 या दोन
वर्गात परिशिष्ठ नुसार वर्गीकरण करण्यात येत असून यांना खालील अटी व शर्तीचे
आधारे P-1 या लाईनमधील दुकाने विषम तारखेस दि.
5,7,9,11,13,15,17,19,21,23,25, 27,29 या प्रमाणे सुरू राहतील, P-2 या लाईनमधील दुकाने
सम तारखेस दि. 6,8,10,12,14,16, 18,20,22,24,26,28,30 या प्रमाणे दुकाने सुरू करून
व्यवसाय करण्यासाठी परवानगी राहील. व सम विषम प्रमाणे सुरू राहणारी सर्व दुकाने
व आस्थापना सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली
आहे. यासह ईतर नियमावली, सम विषम बाबत तसेच कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी घ्यावयाच्या
काळजी बाबत दि. 5 जून रोजी प्रसिध्दी
देण्यात आली होती.
शहरातील दुध विक्रेता, दुध डेअरी यांचेसह मेडीकल स्टोअर्स, कृषी विषयक साहित्याची
दुकाने व कृषी सेवा केंद्रे ह्यांनासुध्दा सम-विषम दिनांकाची अटमधून सुट देण्यात
येत असून त्यांनी आपली दुकाने प्रशासनाने दिलेल्या वेळेमध्ये उघडण्यास तसेच
परवाना प्राप्त असलेले व अन्न व औषध प्रशासन यांनी परवानगी दिलेले रेस्टॉरंट/खाद्यगृहे
यांचे मार्फत घरपोच सेवा देण्यासाठी तसेच शहरातील स्वीट मार्ट व फरसाण विक्री
करणा-या दुकानधारकांनी सम-विषम नियमाचे पालन करून दुकाने उघण्यासाठी (नियमांचे
पालन करून व फक्त पार्सल सुविधाने सामान विक्री करण्यासाठी) मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये परवानगी देण्यात येत आहे.
शहरातील परवानगी असलेल्या सर्व व्यावसायिक प्रतिष्ठान धारकांना मनपा प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात येत आहे कि, त्यांनी सम विषम दिनांकाप्रमाणेच आपली दुकाने उघडावी सम-विषमचा नियम मोडणा-या दुकानधारकांविरूध्द पहिल्यांदा आढळून आल्यास त्यांच्यावर 5 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार तसेच दुस-यांदा आढळून आल्यास शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत सील करण्याची कारवाई त्यांच्या दुकानावर करण्यात येणार.
तसेच दि. 05/06/2020 रोजीचे संपुर्ण आदेश वाचण्याकरिता (http://amcakola.blogspot.com/2020/06/blog-post.html) या लिंकवर जावे.
Comments
Post a Comment