15 जुन पर्यंत जनता भाजी बाजार येथे फक्त किरकोळ भाजी व फळ विक्रीस मुभा – मनपा प्रशासन.

अकोला दि. 31 मे 2021 - अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भावास आळा घालण्याच्या दृष्टीने मा.जिल्हाधिकारी यांचे दि. 31/5/2021 रोजीचे प्राप्त आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागा करीता दि.15/6/2021 चे रात्री 12 वाजे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याबाबतचे आदेश निर्गमीत झाले आहेत. त्या अनुषंगाने मनपा आयुक्‍त नीमा अरोरा यांच्‍या  आदेशान्‍वये शहरातील जनता भाजीबाजार संदर्भाने खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्‍यात आले आहे.

 1. जनता भाजी बाजार येथील किरकोळ भाजीपाला व फळ व्यवसायीकास भाटे क्लब येथे व्यवसाय करण्याबाबत या पुर्वी पारीत करण्यात आलेले आदेश रदद करण्यात आले असुन त्यांना जनता भाजी बाजार येथे शासनाने दिलेल्या विहीत वेळेत व्यवसाय करण्यास मुभा राहिल.

2. जनता बाजार येथील सर्व प्रकारची जिवनावश्यक दुकाने/किराणा/औषधी दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 2 वाजे पर्यंत व कृषीसेवा केंद्राची दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 3 वाजे पर्यंत सुरु राहतील.

3. तसेच या व्यतीरीक्त इतर बिगर अत्यावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजे पर्यंत सुरु राहतील मात्र शनिवार व रविवार रोजी पूर्णत: बंद राहतील.

4. महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी घाऊक व्यवसाय करण्याकरिता आवश्यक व्यवस्था असल्यामुळे पर्यायी जागा म्हणुन जनता भाजी बाजाराचा यापूढे हर्रासी करीता वापर करता येणार नाही. उपरोक्त व्यवसाय धारकांना व्यवसाय करतांना सोशल डिस्टंसिंग तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. सदरचे आदेश हे दि. 1 जुन 2021 रोजीचे सकाळी 8 वाजता पासून लागू होतील. कृपया संबंधीतांनी याची नोंद घ्‍यावी.

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.