जनता भाजी बाजार येथील व्याववसायिकांची सुनावणी लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्याणत आली.


 

अकोला दि.10 मे 2021 – अकोला जनता भाजी बाजार येथील वार्षिक भाडेपट्यावरील यांचे जागे संदर्भात नैसर्गिक न्‍यायाच्‍या दृष्‍टीने म्‍हणने ऐकुन घेण्‍यारिता महानगरपालिका प्रशासनाकडून दि. 10, 11 आणि 12 मे 2021 रोजी सुनावणी ठेवण्‍यात आली होती.

          परंतू अकोला शहरामध्‍ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्‍यासाठी मा.जिल्‍हाधिकारी यांचे दि. 7/5/2021 रोजीचे आदेशान्‍वये अकोला शहरामध्‍ये कडक लॉकडाउन लावण्‍यात आले आहे. म्‍हणून जनता भाजी बाजार येथील व्‍यावसायिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्‍यास अडथळा निर्माण होत असल्‍याने सदरच्‍या  घेण्‍यात येणा-या सुनावण्‍या पुढील आदेशापर्यंत स्‍थगीत करण्‍यात येत आहेत. यापुढे होणा-या सुनावणी बाबत व्‍यासायिकास स्‍वतंत्रपणे सुचित करण्‍यात येईल. तसेच उपरोक्‍त नमुद कोव्‍हीड-19 विषयक तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्‍याच्‍या दृष्‍टीने जनता भाजी बाजार येथे व्‍यावसायिकास कोणताही व्‍यवसाय करण्‍यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध राहील याची संबंधीतांनी नोंद घ्‍यावी.

Comments

  1. सद्य स्थीतीत अकोला शहरात शिवसेना वसाहत भागात दुषीत पाणी पिण्यासाठी वापर होत आहे अकोल्यातील पाणीपुरवठा टांकी कधीही साप करत असल्याचे दिसुन येत नाही नागरीक पान्यातून होनार्या विषाणूजन्य रोगाची लागन होत आहे पिन्याच्या पान्यात पावडरचा उपयोग होत नाही याला प्रशासकीयसेवेत असनारे लोकाच्या हलगर्जीपणा मुळे विषेश लक्ष नाही

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.