विशेष मतदार नोंदणी मोहीम

                    
राज्‍य निवडणूक आयोग आणि मुख्‍य निवडणूक अधिकारी, महाराष्‍ट्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 1 नोव्‍हेंबर ते 30 नोव्‍हेंबर 2021 या कालावधीत भारत निवडणूक आयोगाकडून राबविण्‍यात येणा-या विधान सभा मतदार याद्यांच्‍या संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रमाकरीता विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्‍यात येत आहे. आगामी अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता विधानसभा मतदार संघाची मतदार यादी वापरली जाणार आहे. करिता अकोला महानगरपालिकेच्‍या आगामी निवडणूकीत मतदानाचा हक्‍क बजावण्‍याकरीता तसेच निवडणूक लढविण्‍याकरीता नाव नोंदविण्‍याची ही संधी आहे. करिता मा. राज्‍य निवडणूक आयोग व मुख्‍य निवडणूक अधिकारी यांचे संयुक्‍त विद्यमाने दि. 27 28 नोव्‍हेंबर, 2021 रोजी आपल्‍या जवळच्‍या मतदान केंद्र इमारतीत नाव नोंदणीसाठी विशेष शिबीर आयोजित केले आहे, तसेच आपणास आवश्‍यक असलेल्‍या  माहितीसाठी 1950 ही हेल्‍पलाईन सुरु केली आहे तसेच व्‍हॉट्स अॅप महाव्‍होटर, चॅटबॉट क्र.+91 7669300321 किंवा http://bit.ly/mahavoter वर संपर्क करता येईल तसेच ऑनलाईन नाव नोंदणी www.nvsp.in या पोर्टलवर करता येईल.

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.