लोकशाही पंधरवाडा निमित्त नवीन मतदार नोंदणी करून आणि 2022 मध्ये होउ घातलेल्या मनपा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे हक्क बजावून मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे – महापौर सौ.अर्चना जयंत मसने.






    भारतीय संविधानाच्‍या उद्देशिकेप्रमाणे भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्‍ताक देश असून भारताने त्रिस्‍तरीय लोकशाही पध्‍दत स्विकारली आहे. ही लोकशाही बळकट करण्‍याच्‍या दृष्‍टीने सन 1992 मध्‍ये 73 व 74 व्‍या घटना दुरूस्‍तीव्‍दारे स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांना ‘’स्‍वतंत्र स्‍थानिक शासन’’ म्‍हणून संविधानिक मान्‍यता देण्‍यात आली असून त्‍यांच्‍या निवडणुका निर्भय, मुक्‍त व पारदर्शकरित्‍या घेण्‍यासाठी प्रत्‍येक राज्‍यामध्‍ये स्‍वतंत्र राज्‍य निवडणुक आयोगाची स्‍थापना करण्‍यात आली आहे. ्‍यामध्‍ये ा असून त्‍यांच्‍य                                                    त्‍या अनुषंगाने लोकशाहीस अधिक बळकट करण्‍यासाठी मा.राज्‍य निवडणुक आयोगाच्‍या आदेशान्‍वये दि. 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही, निवडणुक व सुशासन या विषयावर लोकशाही पंधरवाडा साजरा करण्‍यात येतो.

                त्‍या अनुषंगाने  ध्‍ये तव्‍या ारांनाी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिना निमित्‍त अकोला महानगरपालिका मुख्‍य कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमामध्‍ये माझ मत, माझी पत आणि माझ मतदान, माझा स्‍वाभिमान या स्‍लोगनाची रांगोळी काढून जनजागृती करण्‍यात आली तसेच शहरातील प्रत्‍येक नागरिकांनी वयाचे 18 वर्ष पुर्ण झाल्‍यावर ऑनलाईन पध्‍दतीने आपली मतदार म्‍हणून नोंदणी करावी, आणि 2022 मध्‍ये होउ घातलेल्‍या मनपा सार्वत्रिक निवडणुकीमध्‍ये कोणत्‍याही प्रलोभनास बळी न पडता मतदानाचे हक्‍क बजावून लोकशाहीस अधिक बळकट करून आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य पार पाडाण्‍याचे आवाहन महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांच्‍या प्रजासत्‍ताक दिनाच्‍या शुभेच्‍छापर भाषणाव्‍दारे आवाहन करण्‍यात आले.   

    Comments

    Popular posts from this blog

    शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

    कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.