आजादी का अमृत महोत्सव, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्ग मनपा शाळांमध्ये जाणीवजागृती व मार्गदर्शन.


                          
                                                

आजादी का अमृत महोत्‍सव, हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे हा उपक्रम राबविण्‍यात येत असून मनपाच्‍या शाळांमधील विद्यार्थ्‍यांमध्‍ये या उपक्रमाबाबत जाणीवजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहे. त्‍या अनुषंगाने अकोला महानगरपालिकेच्‍या विविध शाळांमध्‍ये आजादी का अमृत महोत्‍सव, "हर घर तिरंगा" उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्‍येक घरावर केंद्र व राज्‍य शासनाच्‍या सुचनेनुसार 13 ते 15 ऑगस्‍ट या कालाधीत राष्‍ट्रीय ध्‍वज फडकविण्‍याच्‍या दृष्‍टीने जाणीवजागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रम संपन्‍न झाला आहे.

          यावेळी उपस्थित विद्यार्थी/विद्यार्थ्‍यींनीना ध्‍वजसंहितेचे पालन करून तिरंगा झेंडा लावण्‍यासाठी मार्गदर्शन करून राष्‍ट्रीय ध्‍वज लावणे बाबत जाणीवजागृती करून देण्‍यात आली आहे, तसेच विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या घरासोबतच परिसरातील नागरिकांना सुध्‍दा या उपक्रमाबाबत माहिती देउन ध्‍वज लावणे बाबत प्रेरित करण्‍यासाठी मार्गदर्शन करण्‍यात आले आहे. तसेच यावेळी मनपा शालेय विद्यार्थ्‍यांनी या उपक्रमाबाबत खूप उत्‍साह दाखवून हर घर तिरंगा बाबत विविध घोषवाक्‍य म्‍हटले आहे.

           प्रत्‍येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहिताचे पालन करावे, तिरंगा फडकविताना केसरी रंग वरच्‍या  बाजूने असावा, घरोघरी तिरंगा हा 13 ते 15 ऑगस्‍ट 2022 या कालावधीत फडकलेला असेल, दररोज सायंकाळी ध्‍वज उतरविण्‍याची आवश्‍यकता नाही, मात्र कार्यालयांनी ध्‍वज संहिता पाळणे आवश्‍यक राहील, तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपुर्वक सन्‍मानाने उतरवावा, दि.13 ते 15 ऑगस्‍ट 2022 या कालावधीत हर घर झेंडा उपक्रमांतर्गत लावण्‍यात आलेले झेंडे अभियान कालावधी नंतर प्रत्‍येकांनी सन्‍मानाने व सुरक्षित ठेवावे, अभियान कालावधी नंतर झेंडा फेकला जावू नये, तो सन्‍मानाने जतन करून ठेवावा, अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला  झेंडा कुठलेही परिस्थितीत लावू नये.   

          शहरातील नागरिकांना अकोला महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्‍यात येत आहे कि, 13 ते 15 ऑगस्‍ट या कालावधीत आपल्‍या घरावर भारतीय ध्‍वज संहितेचे पालन करून तिरंगा झंडा फडकवून या राष्‍ट्रीय उपक्रमात आपले मोलाचे सहभाग नोंदवावे ही विनंती. 

           


Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.