आजादी का अमृत महोत्सव, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्ग मनपाव्दारा ध्वज वितरण सुरू.
आजादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा
उपक्रमांतर्गत अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारे हा उपक्रम मोठ्या उत्साहाने
राबविण्यात येत आहे, त्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी
यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना तिरंगा ध्वज
घेणे अधिक सोईचे व्हावे याकरिता मनपा मुख्य कार्यालया सोबत चारही क्षेत्रीय
कार्यालय येथे शनिवार आणि रविवार सुटीचे दिवस धरून सकाळी 10 ते संध्याकाळी 6
वाजेपर्यंत ध्वज विक्रीसाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. याच सोबत झोन निहाय
आरोग्य निरीक्षक व कर वसुली लिपीक यांच्या व्दारे त्यांच्या कार्यक्षेत्रातील
व्यावसायिक प्रतिष्ठान धारकांना त्यांच्या प्रतिष्ठानात जाऊन ध्वज
खरेदीसाठीची सुविधा देण्यात येत आहेत. प्रति ध्वज
काठीसह किंमत रूपये 30/- प्रमाणे आहे, तसेच झेंडा
घेण्या-या नागरिकांना झेंडा सोबत झेंडा फडकवितांना ज्या सुचनांचे पालन करावयाचे
आहे त्या सुचनांचे पॅम्लेट्स सुध्दा सोबत देण्यात येत आहे.
राष्ट्रीय ध्वज मिळण्याचे ठिकाण – भांडार विभाग, अकोला महानगरपालिका मुख्य
कार्यालय, गांधी रोड, अकोला. पुर्व झोन कार्यालय – जुनी
मनपा शाळा क्रं. 15, अजमेरा हॉस्पीटल समोर, रतनलाल प्लॉट, अकोला. पश्चिम झोन कार्यालय – जुनी
मनपा शाळा क्रं. 1, डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या बाजुला, डाबकी रोड, जुने
शहर, अकोला. उत्तर झोन कार्यालय – जुनी
मनपा शाळा क्रं. 2, पाण्याच्या टाकीजवळ, रेल्वे स्टेशन रोड, अकोला. दक्षिण झोन कार्यालय – मौलाना
अब्दुल कलाम आझाद कॉम्प्लॅक्स, सिंधी कॅम्प, अकोला. |
शहरातील नागरिकांना अकोला महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन
करण्यात येत आहे कि, 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर भारतीय ध्वज
संहितेचे पालन करून तिरंगा झंडा फडकवून या राष्ट्रीय उपक्रमात आपले मोलाचे सहभाग
नोंदवावे ही विनंती.
Comments
Post a Comment