आजादी का अमृत महोत्सव - ‘’मेरी माटी मेरा देश’’ या राष्ट्रीय उपक्रमात शहरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा - कविता व्दिवेदी, मनपा आयुक्त तथा प्रशासक.
अकोला महानगरपालिका प्रशासना व्दारा ‘’आजादी का अमृत
महोत्सव’’ - ‘’मेरी माटी मेरा देश’’ अर्थात ‘’माझी माती माझा देश’’
उपक्रमात शासनाच्या मार्गदशक सुचनेनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
असून ज्यामध्ये अभियानात शहरामध्ये वसुधा वंदन, शीला फलकम (स्मारक),
पंचप्रण शपथ, अमृत वाटीका ‘’हर घर तिरंगा’’ या कार्यक्रमांचा समावेश
आहे.
या उपक्रमामध्ये शहरातील सर्व नागरिकांनी ‘’हर घर तिरंगा
मोहीमे’’ अंतर्गत आपल्या घरावर 13 ते 15
ऑगस्ट या कालावधीत भारतीय ध्वज संहितेचे पालन करून
तिरंगा झंडा फडकावा आणि पंचप्रण प्रतिज्ञा घेउन
प्रतिज्ञा घेतांनाचा सेल्फी फोटो काढून शासनाच्या https://merimaatimeradesh.gov.in/ या वेब साईटवर अपलोड करून प्रमाणपत्र डाऊनलोड
करून या राष्ट्रीय कामामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक
कविता व्दिवेदी यांनी आवाहन केले आहे. (शपथ कशी घ्यावी - शपथ घेतांना प्रत्येक व्यक्तीच्या उजव्या हातात मातीचा दिवा किंवा मुठभर माती घेवून
थपथ घ्यावी व शपथ घेतांनाचा सेल्फी फोटोग्राफ काढावा.)
‘’मेरी माटी
मेरा देश’’ अर्थात
‘’माझी माती माझा देश’’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना शपथ चे फोटो काढण्याचे
कार्य अधिक सोईचे व्हावे याकरिता मनपा प्रशासनाव्दार चारही झोन कार्यालय आणि
अकोला महागनरपालिका मुख्य कार्यालय येथे सेल्फी पॉइंट सुरू करण्यात आले आहे.
पंचप्रण शपथ – आम्ही शपथ घेतो की, 0 भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित
राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. 0 गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. 0 देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करू. 0 भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे
संरक्षण करण्याप्रती सन्मान बाळगू. 0 देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे
पालन करू. |
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment