Posts

Showing posts from March, 2020

शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर भरून मनपा प्रशासनास सहकार्य करावे – मनपा आयुक्त.

औषध व किराणा खरेदीसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध – मनपा आयुकत.

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – मनपा आयुक्त.

संचार बंदीच्या काळात औषधी व किराणा घरपोच बोलविण्या साठी आनलाईन अॅप उपलब्ध.

Rotaract E-seva  घर पर रहें और किराना और दवाइयों का ऑर्डर करें। कृपया सामाजिक दूरी बनाए रखें और लॉकडाउन के दौरान घर पर रहें और अपने और दूसरों को कोरोनावायरस से सुरक्षित रखें .. !! इस लिंक पर जाकर कृपया ऑनलाइन ऑर्डर करे।  http://homedeliveryservice.ap-south-1.elasticbeanstalk.com/                                🙏🏻धन्यवाद🙏🏻 कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर संपुर्ण देशामध्‍ये 14 एप्रील पर्यंत संचार बंदी लावण्‍यात आली आहे­ व प्रशासनाव्‍दारा शहरातील नागरिकांना घरीच थांबण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे. परंतू ब-याच नागरिकांना जीवनावश्‍यक वस्‍तू घेण्‍याकरिता बाजारात जावे लागते यासाठी मनपा प्रशासन व रोट्रॅक्‍ट क्‍लब अकोला मिडटाउन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने जीवनावश्‍यक वस्‍तू जसे औषधी व किरणा सामान ऑनलाईन बोलविण्‍यासाठी ऑनलाईन डिलेव्‍हरी अॅप्‍लीकेशन कार्यान्‍वीत करण्‍यात आला असून नागरिकांनी या लिंकवर जाउन जे सामग्री बोलवायची आहे ती भरून द्यावी त्‍यांनंतर 24 तासाच्‍या आत क्‍लबचे कार्यकर्ते आर्डर केलेली वस्‍...

मनपा सोशल सेलच्या समन्वयाने समाजसेवी संघटनांनी गरजूंना पुरविले भोजन.

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर उपाययोजनावर खर्च करण्यासाठी नगरसेवक श्री बाळ टाले यांनी दिले तीन महिन्याचे मानधन.

Image
संपुर्ण जग हे कोरोना विषाणूच्‍या महामारीने ग्रसीत असून अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये याचा प्रादुर्भाव होउनये यासाठी महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेृ. तथापि महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माजी स्‍थायी समिती सभापती व नगरसेवक श्री बाळ टाले यांनी त्‍यांचे तीन महिन्‍याचे मानधन कोरोना संदर्भातील उपाययोजनांवर खर्च करण्‍याकरिता कपात करण्‍यात यावे असे पत्र स्‍थायी समिती सभापती श्री सतीष ढगे व मनपा उपायुक्‍त यांच्‍या सुपुर्द केले.

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मनपा व्दारे बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून व विदेशातून आलेल्या नागरिकांचे सर्व्हेक्षणाचे काम पुर्ण.

कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर अकोला जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होउ नये यासाठी अकोला महानगरपालिका क्षेत्रांमध्‍ये प्रत्‍येक घरी जाउन सर्दी, खोकला किंवा कोरोना सदृष आजार दिसणा-यांची तसेच बाहेरील जिल्‍ह्यातून, राज्‍यातून व विदेशातून आलेल्‍या नागरिकांची माहिती दिलेल्‍या   प्रपत्रामध्‍ये भरून घेण्‍यासाठी 300 पथकांव्‍दारे सर्व्‍हेक्षणाचे काम पुर्ण झाले असून पुर्व क्षेत्रांतर्गत एकुण 32742 मालमत्‍तांना भेटी देण्‍यात आल्‍या आहेत ज्‍यामध्‍ये ईतर जिल्‍ह्यातून/गावांतून आलेल्‍या नागरिकांची संख्‍या 1778 आहे व विदेशातून आलेल्‍या नागरिकांची संख्‍या 15 आहे, तसेच पश्चिम क्षेत्रांर्गत एकुण 36606 मालमत्‍तांना भेटी देण्‍यात आल्‍या आहेत ज्‍यामध्‍ये ईतर जिल्‍ह्यातून/गावांतून आलेल्‍या नागरिकांची संख्‍या 1067 आहे व विदेशातून आलेल्‍या नागरिकांची संख्‍या 89 आहे, तसेच दक्षिण क्षेत्रांतर्गत एकुण 46023 मालमत्‍तांना भेटी देण्‍यात आल्‍या आहेत ज्‍यामध्‍ये ईतर जिल्‍ह्यातून/गावांतून आलेल्‍या नागरिकांची संख्‍या 1895 आहे व विदेशातून आलेल्‍या नागरिकांची संख्‍या 12 आहे, तसेच उत्‍तर क्षेत्रांतर्ग एकुण 35142 मालमत्‍...

कोरोनाचा प्रादुर्भाव अकोल्यात होउनये यासाठी सर्वांनी घरीच थांबणे अत्यंत आवश्यक – महापौर सौ. अर्चना जयंत मसने.

संपुर्ण जग हे कोरोनाच्‍या संकटाशी लढा देत आहे तसेच आपल्‍या बाजुच्‍या   जिल्‍ह्यातसुध्‍दा कोरोनाचे रूग्‍ण आढळून आलेले आहे व आपल्‍यासाठी चांगली गोष्‍ट ही आहे कि आपल्‍या   शहरामध्‍ये कोरोना संक्रमीत एकही रूग्‍ण नसून आपल्‍या शहरामध्‍ये कोरोनाचा प्रादुर्भाव होउ नये यासाठी सोशल डिस्‍टसींग ठेवणे हाच उपाय असून सर्व नागरिकांनी शासनाच्‍या वेळोवेळी मिळणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे अतिआवश्‍यक आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी घरीच थांबावे.   जीवनावश्‍यक वस्‍तू घेण्‍यासाठीच फक्‍त घरातील एक सदस्‍यांनी घराबाहेर निघावे व कोरोना संदर्भातील शासनाच्‍या येणा-या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्‍याचे आवाहन महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी केले आहे.        

गरजू नागरिकांना मदत करणारे दानदात्यांनी मनपा सोशल सेलशी संपर्क साधावे मनपा आयुक्त यांचे आवाहन.

शासन निर्णयानुसार आज मनपात महानगरपालिका स्तयरीय समितीचे गठन.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या आदेशाप्रमाणे लॉकडाउनच्‍या कालावधीत अडकलेल्‍या  मजूर , विस्‍तापीत व बेघर व्‍यक्‍तींना आवश्‍यकतेनुसार निवारागृह , अन्‍न , पाणी व वैद्यकीय देखभाल सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याकरिता महानगरपालिका स्‍तरावर शहरी भागासाठी सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी महानगरपालिका स्‍तरीय समितीचे गठन करण्‍याकरिता आदेश प्राप्‍त झाले होते त्‍या अनुषंगाने आज दि. 30 मार्च रोजी मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती मध्‍ये उपायुक्‍त प्रशासन सदस्‍य सचिव , तसेच सदस्‍य म्‍हणून उपायुक्‍त विकास , मुख्‍य लेखा अधिकारी , कार्यकारी अभियंता बांधकाम , उपअभियंता जलप्रदाय , वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी , शिक्षणाधिकारी , सुरक्षा अधिकारी , क्षेत्रीय अधिकारी पुर्व , पश्चिम , उत्‍तर , दक्षिण , विभाग प्रमुख एन.यु.एल.एम. , विभाग प्रमुख अतिक्रमण , विभाग प्रमुख बाजार , विभाग प्रमुखअग्निशमन (नैसर्गिक आपत्‍ती कक्ष) यांचा समावेष असलेली समितीचे गठन करण्‍यात आले आहे.   

बेघर निवारा येथील नागरिकांची मनपा वैद्यकीय चमुव्दारा तपासणी.

Image
  कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर अकोला महानगरपालिकेच्‍या आकोट फैल येथील बेघर निवारा येथे थांबलेल्‍या एकुण 45 नागरिकांची मनपा वैद्यकीय आरोग्‍य विभागाच्‍या वतीने आज दि. 30 मार्च रोजी तपासणी करण्‍यात आली तसेच 18 नागरिकांचे रक्‍ताचे नमुने सुध्‍दा घेण्‍यात आले आहेत. याचसोबत उपमहापौर श्री राजेंद्र गिरी यांच्‍या उपस्थितीत न्‍यु देशमुख फैल येथील नागरिकांची सुध्‍दा तपासणी करण्‍यात आली.           सदर तपासणी वैद्यकीय आरोग्‍य पथकातील मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.फारूख शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुचित्रा मोहिते, प्रयोग शाळा तंत्रज्ञ अंकुश धुड, आय.टी.सी.केंद्राचे प्रविण रोठे, सिस्‍टर देशमुख यांच्‍या व्‍दारे करण्‍यात आली. 

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून व विदेशातून आलेल्या नागरिकांचे सर्व्हेक्षणाचे काम शेवटच्या टप्याात.

कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर अकोला जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होउ नये यासाठी अकोला महानगरपालिका क्षेत्रांमध्‍ये प्रत्‍येक घरी जाउन सर्दी, खोकला किंवा कोरोना सदृष आजार दिसणा-यांची तसेच बाहेरील जिल्‍ह्यातून, राज्‍यातून व विदेशातून आलेल्‍या नागरिकांची माहिती दिलेल्‍या प्रपत्रामध्‍ये भरून घेण्‍यासाठी 300 पथकांव्‍दारे सर्व्‍हेक्षणाचे काम शेवटच्‍या अप्‍प्‍यात असून आजपर्यंत पुर्व क्षेत्रांतर्गत 29951 मालमत्‍तांचे, पश्चिम क्षेत्रांर्गत 36524 मालमत्‍तांचे, उत्‍तर क्षेत्रांतर्गत 31745 मालमत्‍तांचे व दक्षिण क्षेत्रांतर्गत 37698 मालमत्‍तांचे सर्व्‍हेक्षणाचे काम पुर्ण झाले आहे. यामध्‍ये उत्‍तर व पश्चिम झोनचा सर्व्‍हेक्षणचा काम पुर्णत्‍वास आला आहे. अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे शहरातील नागरिकांना आवाहन करण्‍यात येत आहे कि, आपल्‍या घरी मनपा व्‍दारे येणा-या पथकास बाहेरून आलेल्‍या व्‍यक्‍तीची संपुर्ण माहिती देउन तसेच बाहेरून आलेल्‍या नागरिकांनी स्‍वत:हून 14 दिवस होम क्‍वारंटईनमध्‍ये राहून सहकार्य करावे ही विनंती.

स्वयं स्फुर्तीने विविध संघटनांनी गरजुंना पुरविले नाश्ता, चहा व भोजन. मनपा आयुक्त यांनी मानले मनापासून आभर.

कोरोनाच्या पार्श्वीभुमिवर मनपा प्रशासन व पोलीस प्रशासनाव्दा्रे भाजी विक्री व खरेदीसाठी करण्यात आलेली व्यवस्था.

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शहरात सर्व्हेक्षणाचे काम युध्द पातळीवर सुरू

Image

कोरोनाच्या पार्श्ववभुमिवर मनपा प्रशसासन व पोलीस प्रशासनाव्दारे भाजी विक्री व खरेदीसाठी करण्यात आलेली व्यावस्था्.

Image

आज सकाळी मनपा आयुक्त यांनी होलसेल किराणा व्यावसायिकांना सोशल डिसटसींग ठेवण्याबाबत केली चर्चा.

Image
कोरोना रोगाची साथ ही सर्वत्र वेगाने पसरत असून अकोला शहरामध्‍ये याचा प्रादुर्भाव टाळण्‍याकरिता सोशल डिस्‍टगींग ठेवणे व गर्दीच्‍या ठिकाणी न जाणे मात्र हेच प्रभावी उपाय असून आज मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी नगरसेवक अमोल घोगे यांच्‍या सोबत हायवेवर असलेले होलसेल किरणा बाजार येथे सकाळी भेट देउन व्‍यावसायिकांशी चर्चा केली व त्‍यांना सामान घेणा-यांना किमान 1 मीटर अंतरावर ठेवण्‍यासाठी मार्कींग करून उभा करून रांगेने सर्वांना सामान देण्‍यात यावे व नागरिकांची गर्दी होउ नये यासाठी विशेष काळजी घेण्‍यासाठीच्‍या सुचना दिल्‍या. तसेच सर्वांनी मास्‍क किंवा चांगल्‍या प्रकारे धुतलेला रूमाल बांधण्‍यासाठी प्रवृत्‍त करावे अशा सुचना दिल्‍या.  

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर आदिवासी समाजाचे कामगारांना दानदात्याकडून घेउन मनपा स्थाा.स.सभापती व नगरसेवकांनी केले जीवनावश्यक वस्तुंचे वितरण.

Image
कोरोना रोगाची साथ ही सर्वत्र वेगाने पसरत असून शासाने संपुर्ण भारतात 21 दिवसांची संचारबंदी लागू केलेली आहे. त्‍या अनुषंगाने मजुरीचे काम करणा-या कामगारांवर उपासमरीची पाळी असून मनपा स्‍थायी समिती सभापती सतीष ढगे, नगरसेवक तुषार भिरड, शशी चोपडे व मनपा कर्मचा-यांनी किराणा बाजार व भाजी बाजार येथे जाउन त्‍यांना विनंती केली असता व्‍यावसायिकांनी स्‍वत:पुढाकार घेउन त्‍यांना किराणा व भाजीचा मुबलक साठा दिला यावर पदाधिकारी व कर्मचा-यांनी त्‍या व्‍यावसायिकांचे मनापासून आभार व्‍यक्‍त करून जीवनावश्‍यक सामग्री गरजू कामगारांना दिली. यावर दानदाता व्‍यावसायिकांचे सर्वीकडे कौतुक होत आहे.           तसेच यावेळी स्‍थायी समिती सभापती श्री सतीष ढगे यांनी शहरातील दानदातांना आवाहन केले आहे कि, त्‍यांनी आपल्‍या उपाशी असणा-या कामगार व हातमजुरी करणा-यांसाठी असाच सहकार्य करावे तसेच शहरातील गरजू नागरिकांना मदत हवी असेल किंवा मदत करावयाची असेल तर अकोला महानगरपालिका येथे सोशल सेल उभारण्‍यात आला आहे कृपया अशा नागरिकांनी सोशल सेलचे योगेश मारवाडी 7709588222 व महेश राऊत 77...

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर संपुर्ण शहरामध्येे होणा-या फव्वा‍रणीचे मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केली पाहणी.

Image
अकोला शहरामध्‍ये कोरोनाचा संभाव्‍य प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी संपुर्ण शहरामध्‍ये महानगरपालिका व्‍दारे कीट/जंतुनाशक फव्‍वारणी चे काम 5 ट्रॅक्‍टर व 4 अत्‍याधुनीक फव्‍वारणी यंत्राव्‍दारे सुरू असून आज सकाळी मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी त्‍यांची पाहणी केली. 

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर संपुर्ण शहरामध्येन अकोला महानगरपालिका व्दारा जंतुनाशक फव्वारणी.

Image
कोरोना रोगाची साथ ही सर्वत्र वेगाने पसरत असून या साथीचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी अकोला महानगरपालिकांतर्गत असलेल्‍या सर्व प्रभागांमध्‍ये 5 ट्रॅक्‍टर व्‍दारे तसेच शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यांवर कोरोना विषाणूचा संभाव्‍य प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी शहरातील 9 मीटरपेक्षा जास्‍त असलेल्‍या मुख्‍य रस्‍त्‍यांवर झोन निहाय 500 लीटर क्षमता असलेले 4, शक्‍तीमान प्रोटेक्‍टर अत्‍याधुनिक मशीनव्‍दारे किटाणू व जंतुनाशक (सोडीयम हाईपोक्‍लोराईड ) फव्‍वारणीची सुरूवात करण्‍यात आली आहे ही फव्‍वारणी यंत्र श्री प्राजल गोपनारायण, आदर्श फार्म सर्विसेस (युनिमार्ट अकोला), यु.पी.एल.इंडीया लिमिटेड, मुंबई यांच्‍या सौजन्‍याने निशुल्‍क करण्‍यात येत आहे मात्र ऑपरेटरचे मानधन व इंधनाचा खर्च महानगरपालिका अकोला हे करणार आहे. 

Corona Awareness Message Of Akola Municipal Commissioner

Corona Awareness Message Of Akola Municipal Commissioner

Corona Awareness Message Of Akola Municipal Commissioner

Awareness of Vegetable Sellers

Image
अकोला महानगरपालिका पश्चिम क्षेत्रांतर्गत शिवचरण पेठ येथील किरकोळ भाजी विक्रेत्‍यांसोबत सोशल डिस्‍टसींग ठेवणे व नागरिकांची गर्दी टाळणेबाबत मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस व मनपा स्‍थायी समिती सभापती श्री सतीष ढगे यांनी मार्गदर्शनपर सुचना केली.  

AMC Social Cell

महानगरपालिकेमध्‍ये सोशल सेलची स्‍थापना अकोला दि. 27.03.2020 – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी संपुर्ण देशमाध्‍ये  14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचे आदेश पारित केलेले आहे. विषाणुचा प्रसार रोखण्‍यासाठी गर्दी कमी करणे हा एकमात्र उपाय आहे. या आवाहनाला नागरीकांकडुन प्रतिसाद सुध्‍दा मिळत आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे अनेकांच्‍या उपजिवीकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना मदतीच्‍या प्रस्‍तावासह पुढे सरसावल्‍या आहेत. या मदत दाते आणि अकोला शहरातील गरजू कुटुंबांमध्‍ये समन्‍वय असणे गरजेचे आहे याकरिता अकोला महानगरपालिका समन्‍वयकाची भुमिका पार पाडणार आहे. त्‍यासाठी महापालिकेत सोशल सेल गठीत करण्‍यात आला आहे. यासाठी शहरातील दानशुर व्‍यक्‍ती तसेच सामाजिक संघटनांच्‍या मदतीची गरज आहे. महापालिकेला आर्थीक स्‍वरूपात, मनुष्‍यबळ स्‍वरूपात, धान्‍य स्‍वरूपात अथवा किराणा स्‍वरूपात तर सामाजिक संघटनांकडून ही मदत गरजुंपर्यंत पोहचविण्‍यासाठी मदत आवश्‍यक ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन दानशुर व्‍यक्‍ती तसेच सामाजिक संघटनांनी ते देणार असलेल्‍या मदतीच्‍या स्‍वरूपाचा प्रस्‍ताव अपेक्षीत ...

Spraying in Akola

Image
अकोला शहरामध्‍ये कोरोनाचा संभाव्‍य प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी संपुर्ण शहरामध्‍ये महानगरपालिका व्‍दारे कीट/जंतुनाशक फव्‍वारणी चे काम 5 ट्रॅक्‍टर व 4 अत्‍याधुनीक फव्‍वारणी यंत्राव्‍दारे सुरू असून आज सकाळी महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी पाहणी करून सुचना दिल्‍या.  

Control Room Numbers & Free Checkup Doctors List.