अकोला दि. 11 मे 20 ी संख्येमध्ये एकाने वाढ – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना संक्रमीत रूग्ण आढळ्याने अकोला महानगरपालिका येथील आरोग्य विभागासह सर्व विभागाचे अधिकारी/कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहे तसेच यामधून मनपातील दोन सफाई कर्मचा-यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यांना कोरोनापासून बचावासाठी साधन सामग्री जसे मास्क, हॅण्ड ग्लोज, सेनीटायझर देण्यासंदर्भात आज महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी उपमहापौर राजेंद्र गिरी, स्थायी समिती सभापती सतीष ढगे, माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, क्षेत्रीय अधिकारी संदीप गावंडे, विठ्ठल देवकते, राजेंद्र टापरे, आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये संघटनेव्दारे कोव्हीड – 19 मध्ये काम करतांना मृत पावलेल्या कर्मचा-यांचे व कंत्राटी आणि मानसेवी कर्मचारी यांना 15 लक्ष रूपये देणेविषयीची अंमलबजावणी संदर्भात पत्...